मूत्रमार्गाचा संसर्ग (urinary tract infection, UTI), ज्याला सामान्यपणे युरिन इन्फेक्शन किंवा लघवीचा संसर्ग म्हणतात, हा मूत्रमार्गात कुठेही होणारा संसर्ग आहे: मूत्राशय, लघवी शरीराबाहेर नेणारी नळी (मूत्रनलिका, urethra), किंवा किडनी. तो सहसा शौचातील जीवाणू (बॅक्टेरिया) मूत्रमार्गात शिरल्यामुळे होतो.
शरीरात होणाऱ्या संसर्गांपैकी UTI हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात सामान्य संसर्ग आहे. पुरुषांपेक्षा सुमारे चार पट जास्त स्त्रियांना तो होतो, कारण स्त्रियांची मूत्रनलिका लहान असते आणि ती गुदद्वाराच्या जवळ असते.
- मूत्राशयाचा संसर्ग (सिस्टायटिस, cystitis) हा सर्वात सामान्य प्रकार आहे.
- किडनीचा संसर्ग (पायलोनेफ्रायटिस, pyelonephritis) कमी प्रमाणात होतो, पण जास्त गंभीर असतो, आणि त्यावर लवकर उपचार आवश्यक असतात.
बहुतेक UTI वर उपचार करणे सोपे असते, आणि अनेक लवकर बरे होतात.


